राज्यातील इयत्ता अकरावीच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एनसीएल व ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. ही प्रमाणपत्रे उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना पोहोच पावती किंवा हमीपत्राच्या आधारे प्रवेश देऊन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.