अकोला: मुर्तिजापूर स्टेशन महोत्सवावर टीकेची झोड

भुसावळ विभागातील मुर्तिजापूर जंक्शनवर २५ जुलैला झालेल्या ‘स्टेशन महोत्सवा’त फक्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीच उपस्थिती. १५० वर्षांचा वारसा साजरा करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करूनही प्रसारमाध्यमांना डावलण्यात आले. कार्यक्रमाबाबत माहिती नसल्याने सामान्य नागरिकांचा अभाव दिसला. प्रत्यक्ष उपस्थितांनी सांगितले की गडबडीत कसंतरी कार्यक्रम आटपला. या सोहळ्यात आमदार हरीश पिंपळे उपस्थित होते. रेल्वे इतिहास व अमृत भारत योजनेचा गाजावाजा करताना जनतेला पूर्णपणे दुर्लक्षित केल्याची तीव्र नाराजी व्यक्त होते.

సంబంధిత పోస్ట్