ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्प वर्षाअखेरीस खुला होणार?

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 'स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प' (सॅटिस) वर्षाअखेरीस पूर्ण होऊन खुला होण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने या बहुचर्चित प्रकल्पाचे काम वेगाने सुरू ठेवले असून, उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे. स्थानक परिसरातील डेकचे काम सुरू असून, नोव्हेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.

సంబంధిత పోస్ట్